logo

महावितरणचा तीन दिवसीय संप मागे. परभणी: महाराष्ट्र राज्यातील महावितरणच्या ३२ कर्मचारी संघटनांनी तीन दिवसीय संपाची हाक

महावितरणचा तीन दिवसीय संप मागे.

परभणी: महाराष्ट्र राज्यातील महावितरणच्या ३२ कर्मचारी संघटनांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली होती,पण आज सरकारबरोबर झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
महावितरण,महाजनको आणि महापारेषण मधील खासगीकरणाला विरोध करत मध्यरात्रीपासून राज्यातील कर्मचारी संपावर गेले होते. ३२ संघटनांनी एकत्र येऊन तीन दिवसांचा संप पुकारला होता.आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संघटनांशी संवाद साधण्यासाठी बैठक बोलावली होती. तीनही सरकारी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.राज्य सरकारला या तीनही कंपन्यांचे कुठलेही खासगीकरण होणार नाही.त्यामुळे खासगीकरण करण्याचा प्रश्नच येत नाही.”, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली.

16
14667 views
  
1 shares